Gondia Maternal Tragedy : प्रसूतीपूर्वीच बाळाचा मृत्यू; उपचारादरम्यान आईनेही सोडला जीव

Woman Referred From Rawandwadi Primary Health Centre : गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात उपचारादरम्यान २४ वर्षीय पूजा फरकुंडे आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.
Gondia Maternal Tragedy

Gondia Maternal Tragedy

esakal

Updated on

गोंदिया : रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसूतीसाठी गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२०) सायंकाळी घडली. पूजा राकेश फरकुंडे (वय २४, रा. गोंडीटोला, घिवारी) असे मृताचे नाव आहे.

पूजाच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पूजा फरकुंडे या रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नियमित आरोग्यसेवा घेत होत्या. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाठविण्यात आले.

Gondia Maternal Tragedy
Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचे हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना रक्त देण्यात आले.दरम्यान, तपासणीत गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. उपचारादरम्यान मातेचाही मृत्यू झाला.

Gondia Maternal Tragedy
Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

नातेवाइकांकडून चौकशीची मागणी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पूजाच्या शरीरात रक्ताची मोठी कमतरता असल्याचे सांगण्यात आले; मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोप करीत चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com