

Pune Kolhapur NH traffic jam due to accident
esakal
Pune Kolhapur National Highway Accident : (अभिजीत कुलकर्णी) : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे शनिवारी(ता.१४) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संबंधित कंटेनरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.श्वेता अक्षय चव्हाण (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती अक्षय अधिकराव चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.