esakal | वासावरून ठरवला जातो दूधाचा दर्जा..
sakal

बोलून बातमी शोधा

The quality of the milk is determined by the smell

दूध तापत ठेवले आणि उतू जायला लागले की ते दूध नासलेले आहे, हे एखादी गृहिणी सहजपणे सांगते, याच प्रकारे गोकूळच्या दररोजच्या 12 लाख लिटरपर्यंत दूध संकलनाचा पाया म्हणजे प्रशिक्षित 30 लॅब अटेंडंट आहेत. त्यांना लॅब अटेंडंट तांत्रिक नाव असले तरी हे प्रशिक्षित कर्मचारी नाकाच्या आधारे दुधाच्या कॅनचा वास घेवून दुधाचा प्राथमिक दर्जा ठरवतात.

वासावरून ठरवला जातो दूधाचा दर्जा..

sakal_logo
By
मोहन मेस्त्री

कोल्हापूर : दूध तापत ठेवले आणि उतू जायला लागले की ते दूध नासलेले आहे, हे एखादी गृहिणी सहजपणे सांगते, याच प्रकारे गोकूळच्या दररोजच्या 12 लाख लिटरपर्यंत दूध संकलनाचा पाया म्हणजे प्रशिक्षित 30 लॅब अटेंडंट आहेत. त्यांना लॅब अटेंडंट तांत्रिक नाव असले तरी हे प्रशिक्षित कर्मचारी नाकाच्या आधारे दुधाच्या कॅनचा वास घेवून दुधाचा प्राथमिक दर्जा ठरवतात. नंतर रेड अल्कली टेस्ट केली जाते आणि मग कॅनमधील दूध चांगले की खराब याचा निर्णय घेतला जातो. 

हे पण वाचा - Video : चक्क वाघ्या कुत्रा गळ्यातून काढतोय शंख ध्वनी....

गोकूळ दूध संघाकडे येणाऱ्या दुधाची तपासणी केली जाते. दूधाची तपासणीसाठी पारंपारिक पध्दतीने मानवी कौशल्यातून केली जाते. कॅनमधील दुधाच्या वासावरून हे दूध योग्य की खराब याची तपासणी केली जाते. दुधाची गुणवत्ता तपासरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र डिग्री किंवा पात्रता आवश्‍यक नसते, तर त्याची पंचेंद्रिये तीक्ष्ण असणे गरजेचे असते. वासाचे ज्ञान होण्यासाठी गोकूळच्या या लॅब अटेंडंटना खास "संवेदी मुल्यांकन'चे प्रशिक्षण दिले जाते. 

हे पण वाचा - आधीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना…अश्विनी बिद्रेंच्या लेकीचे मुख्यंत्र्यांना भावनिक पत्र

ग्रामीण भागात स्थानिक डेअरीमधून संकलन करताना दूधाचे फॅट तपासून घेतले जाते. संघाच्या नियमानुसार गायी म्हैशींचे दूध काढल्यानंतर दोन तासात ते दूध चिलिंग सेंटर, बल्क मिल्क कुलर किंवा मेन डेअरीमध्ये आलेच पाहीजे या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्याच प्रमाणे दुधाची गाडी डेअरी किंवा चिलींग सेंटरला आल्यानंतर तासाच्या आत ती गाडी रिकामी झाली पाहीजे हा नियम पाळला जातो. क्‍लंजरने ढवळुन दूधाचा वास घेतात. 

कॅन उघडला की दूध फेसाळलेले आहे का?, त्यात स्पॉट आले आहेत काय?, किंवा दुध तापवलेले असेल तर त्याचा वेगळा वास येतो. 

किंवा दूध कोवळे अथवा शिळे असले तरी त्याचा वेगळा वास येतो. वास आलेला कॅनची रेड अल्कली टेस्ट होते. दूध पांढरे झाले तर ते दूध खराब आणि गुलाबी रंग आल्यास ते दूध चांगले समजतात. पण ती टेस्ट ही 100 टक्के वेळा पॉझिटीव्हच झाली आहे. 


गेली 33 वर्षे मी दुधाचा वास घेण्याचे काम करीत आहे. आता कॅन उघडला तरी दुधाची प्रतवारी समजते. या वासाच्या पध्दतीमुळे दुध संकलनाचा वेग वाढतो. 
- पांडुरंग मांगोरे, लॅब अटेंडंट. 

केवळ वासावर दुधाची प्रत ठरवली जात नाही. खरेतर एकूण दुधाच्या 0.01 टक्के दूध वास येणारे असते. दुधाच्या दर्जाची प्रत ठरवण्यात हा वास उपयुक्त ठरतो. सर्व कॅनची टेस्ट करण्यापेक्षा वासाच्या आधारे शंकास्पद ठरवलेल्या कॅनचीच अल्कली टेस्ट केली जाते. 
ही टेस्ट नेहमीच 100 टक्के योग्य ठरली आहे. 
- एस. पी. समुद्रे, व्यवस्थापक, गूण नियंत्रण विभाग.