.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जयसिंगपूर : शहरातील नवीन डीपी रोड, घोडावतनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांचा चावा घेतला. बुधवारी रात्री पिसाळलेल्या या कुत्र्याने तिघांचे लचके तोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने तातडीने नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.