
Radhakrishna Vikhe Patil Oppose Amlatti Dam : आमलट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा ठाम विरोध आहे. याबाबत सरकारने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांशीही चर्चा केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी मी स्वतः बोललो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःयावर लक्ष ठेऊन आहेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. आज त्यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.