esakal |  राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य 30 एप्रिल पर्यंत बंद

बोलून बातमी शोधा

Radhanagari and Sagareshwar sanctuaries closed till April 30 kolhapur marathi news

 गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने अभयारण्य बंद ठेवावी लागली आहेत. यंदा पावसाळ्यानंतर एक नोव्हेंबरपासून राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते.

 राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य 30 एप्रिल पर्यंत बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राधानगरी(कोल्हापूर): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य हे उद्या बुधवार ( ता. ७) पासून 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. अशी माहिती वन्यजीव चे विभागीय अधिकारी विशाल माळी यांनी दिली.

 गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने अभयारण्य बंद ठेवावी लागली आहेत. यंदा पावसाळ्यानंतर एक नोव्हेंबरपासून राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. आज अखेर कमी-अधिक प्रमाणात पर्यटकांची वर्दळ या अभयारण्यात राहिली मात्र राज्यात कोरोणाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने उद्यापासून किमान 30 एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बंदी राहणार आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांनी न येण्याचे आवाहन वन्यजीव विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 कोरोनामुळे अभयारण्य बंद ठेवल्यास येथील पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायावर याचा परिणाम होणार असला तरी संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्याचे बंधनकारक होत आहे. या बाबत आजच वन विभागाचे प्रधान सचिव यांचेकडून अभयारण्य बंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्याचे श्री. माळी यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे