पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले

पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले
Summary

आज सकाळी 6 ला राधानगरी (Radhanagari Dam)धरणाच्या एकूण 8.36 टीएमसी पाणी साठ्यापैकी 8.225 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण सद्या 98.38 टक्के भरले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने कमालीची उघडीप दिली आहे. मात्र, आज पहाटेपासून पुन्हा ढग दाटून आले आहे. यातच जोरदार वारा सुटला असून पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांची भीती वाढली आहे. कोल्हापूर-पुणे महामार्गावरील पाणी अडीच फूट ओसरले झोले आहे. पण अद्याप ही वाहतूक बंदच आहे. आज  सकाळी 6 ला राधानगरी (Radhanagari Dam)धरणाच्या एकूण 8.36 टीएमसी  पाणी साठ्यापैकी 8.225 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण सद्या 98.38 टक्के भरले आहे. 

पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले
कोल्हापूर : NDRF कडून ६०० जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

धरणातून सध्या पुर्वीप्रमाणे 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान अजून धरणाचा एक ही दरवाजा  खुला झालेले नाही. पण, दुपार पर्यंत एखादा दरवाजा उघडला जाण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धरण भरण्याची गती ही काहीशी कमी आहे. याचा सर्वांना दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीतील पाणी ओसरण्याची गती कालपेक्षा काही अंशी कमी झाली आहे. त्यामुळे पूर कमी झाला म्हणून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी पुन्हा आपल्या घरी जाण्याची घाई करू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून केले आहे.Radhanagari-Dam-98.38-percent-fully-Kolhapur-Pune-Highway-closed-kolhapur-rain-update-akb84

पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले
पुणे-बंगरूळ हायवे बंदच; उद्या सायंकाळनंतर सुरू होण्याची शक्यता

बोरबेट कडे जाणारा रस्ता खचला

गगनबावडा तालुक्यातील अंदुर गावातून धुंदवडे बोरबेट कडे जाणारा रस्ता भूस्खलन झाल्याप्रमाणे खचला आहे. या ठिकाणी मोठे खड्डे, चर तयार झाली आहे. सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता जमीन दुभांगल्याप्रमाणे खाली गेला आहे.आंदूर पाझर तलावाच्या काठाने जाणारा हा रस्ता पर्यटकांच्या आवडीचे क्षेत्र बनला होता.आजही शेकडो निसर्गप्रेमी पर्यटक या रस्त्याच्या हिरवाईचा आनंद घ्यायला येत असतात.

पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले
कोल्हापूर : पाऊस उघडला; महापुराचा धोका कायम

कोल्हापुरातील अनेक उद्योजक वकील डॉक्टर अशा लोकांचे या तलावाकाठी फार्म हाउस आहेत. जिल्ह्यातील एक लेकसिटी होत असलेल्या या पाझर तलावाची भिंत गावच्या बाजुलाच आहे. गेले काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हा रस्ता खचला आहे. तरी या तलावाबाबत ही काही दुर्घटना घडू नये अशी प्रार्थना अंदुरकर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com