दिलासादायक : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद ; महापूर ओसरण्यास होणार मदत

Radhanagari dam all doors closed Help panchganga flood relief
Radhanagari dam all doors closed Help panchganga flood relief
Updated on

राशिवडे बुद्रुक - गेली चार दिवस कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदी काठावर महापूराची दहशत माजवलेल्या राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे अखेर आज बंद झाले. पावसाचे प्रमाण कालपासून कमी झाले. जलाशयात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने आज सकाळी सव्वानऊ वाजता सर्व दरवाजे बंद झाले. आता फक्त वीजनिर्मितीला 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. पावसाची अशीच उघडीप राहिल्यास भोगावती व पर्यायाने पंचगंगा नदीला आलेला महापूर झपाट्याने ओसरण्यास मदत होणार आहे. 

दुधगंगा नदीचाही पूर ओसरेल

चार दिवसापूर्वी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजे यापैकी चार दरवाजे खुले झाले होते. यातून व वीजगृहाच्या माध्यमातून 7000 क्युसेकवर पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू होता. काल पासून टप्प्याटप्प्याने हे दरवाजे बंद होत गेले व आज सकाळी सर्व दरवाजे बंद झाले. यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने ओसरणार आहे व हळूहळू पंचगंगेचा ही महापूर उतरण्यास मदत होईल अशी स्थिती आहे. आज सकाळपासून राधानगरी तालुक्यात पावसाची उघडझाप जाणवत आहे.तसेच काळम्मावाडी धरणाचेही उचललेले सर्व दरवाजे बंद केले आहेत. केवळ वीजगृहातून क्यूसेकचा विसर्ग आहे. त्यामुळे दुधगंगा नदीचाही पूर ओसरेल.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandwal temple nirmalya recycling project
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Design of Kolhapur Cricket Stadium
Kini Toll Plaza latest accident update
Marathi News Esakal
www.esakal.com