

धामोड (कोल्हापूर) : राधानगरीत (Radhanagari) दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड ( वय ४७ ) (Anil Barad) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कुंभारवाडी येथे मध्यरात्री घडली. याबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .
राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : जितेंद्र खामकर व विकास कुंभार या दोघांच्यामध्ये रात्री चुना मागण्याच्या कारणावरून मारामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने मामा अनिल रामचंद्र बारड याला बोलावुन घेतले. रात्री ११ वाजता ते दोघेजण कुंभारवाडी येथे गेले असता आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.
अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणुन काम करत होते.
विकास कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आधिक तपास पोलिस निरीक्षक एस. एस. कोळी व पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत.अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणुन काम करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.