
Kolhapur Political Developments : ‘राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. आपल्याकडे कामानिमित्त येणारा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा सल्ला देत आहेत. काँग्रेस सोडण्याबाबत आमची द्विधा अवस्था असली, तरी आम्हाला कार्यकर्त्यांचा विचार करावा लागेल’, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी आज आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मांडली. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी आमदार पाटील यांची कसबा बावडा येथील त्यांच्या घरी भेट घेतली.