
Congress vs NCP Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. पाटील यांच्यासोबत त्यांचा बहुतांश गटही राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहे. त्यामुळे करवीर तालुक्यात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नवीन शिलेदाराला संधी मिळणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून पक्ष म्हणून तसे नियोजन केले जाऊ शकते.