

nurseries Loss
sakla
म्हाकवे: कागल तालुक्यात सुमारे १०० ऊस रोपे बनविणाऱ्या रोपवाटिका आहेत. सतत झालेल्या पावसाने या रोपवाटिकांमध्ये २५ लाख रोपे खराब झाली आहेत. ही रोपे वापराविना पडून आहेत. तयार रोपे विक्री न झाल्यामुळे रोपवाटिकाधारकांचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी आणि लांबलेल्या पावसाचा फटका ऊस रोपवाटिकाधारकांना बसला आहे.