
प्रवीण देसाई
कोल्हापूर : पावसाळा लवकर सुरू झाला की काय? अशी परिस्थिती सर्वांना यंदा अनुभवायला मिळाली. मे महिन्यातच वळीव पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी केले. त्यानंतर जूनमध्ये नियमित पाऊस सुरू झाला. या दोन महिन्यांच्या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील सुमारे १५० झाडे कोसळली. यात चारचाकी वाहनांचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. याचे पंचनामे अग्निशमन दलाकडून करून त्याचे अहवाल तयार आहेत.