esakal | वर्षा पर्यटन सुनेसुनेच. ; पश्‍चिम घाटातील उलाढाल थांबली 
sakal

बोलून बातमी शोधा

Rain tourism is heard. ; Turnover in the Western Ghats stopped

पश्‍चिम घाटातील धबधबे धो-धो कोसळत आहेत, मात्र धबधब्यात चिंब भिजण्यासाठी फारसे पर्यटक यंदा फिरकलेले नाहीत, अशा स्थितीत वर्षापर्यटन सुनेसुने आहे. जिल्ह्यातील सहा डोंगरी तालुक्‍यातील दहा हजारांवर व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे

वर्षा पर्यटन सुनेसुनेच. ; पश्‍चिम घाटातील उलाढाल थांबली 

sakal_logo
By
शिवाजी यादव ः

कोल्हापूर  : घ्या भाजलेली कणसे, घ्या शेंगा, या घ्या पिठलं भाकरी, घ्या गरम कांदा भजी, अशा आरोळ्या दरवर्षी जिल्ह्यातील पश्‍चिम घाट माथ्यावर घुमतात. यंदाही पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलेत तर पश्‍चिम घाटातील धबधबे धो-धो कोसळत आहेत, मात्र धबधब्यात चिंब भिजण्यासाठी फारसे पर्यटक यंदा फिरकलेले नाहीत,

अशा स्थितीत वर्षापर्यटन सुनेसुने आहे. जिल्ह्यातील सहा डोंगरी तालुक्‍यातील दहा हजारांवर व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. 
शाहूवाडीतील बर्की धबधबे, आंबा जंगल सफारी तसेच राधानगरीतील राऊतवाडी, आजऱ्यातील रामतीर्थ धबधबा, भुदरगडावरील रांगणा किल्ला या भागात सर्वाधिक प्रमाणात पावसाळी पर्यटन होते, तर पन्हाळ्यावर बारामाही पर्यटन असते. यंदा कोरोना लॉकडाउनमुळे सर्वच ठिकाणी शुकशुकाट आहे. 
शाहूवाडीत मलकापूरपासून पुढे विशाळगड ते आंबा घाटापर्यंत 50 हॉटेल, 40 जंगल सफारी घडविणाऱ्या गाड्या आहेत. 
राधानगरीत 20-25 हॉटेल आहेत. आजारा आंबोली मार्गावर जवळपास शंभर सव्वाशे हॉटेल आहेत. भुदरगडमध्ये काही घरांत चहा, नाष्टा जेवणाची सोय आहे, तर गगनबावड्यात 20 ते 30 हॉटेल नाष्टा गाड्या आहेत. या सर्वच तालुक्‍यात वर्षा पर्यटन काळात अनेकजण प्रेक्षणीयस्थळे धबधब्यांवर भाजलेली कणसे, पिटलं-भाकरी, ग्राम जेवणाचे स्टॉल्स लावतात यात सर्वाधिक प्रमाण शाहूवाडी, आंबोलीत असते. पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असलेल्या पन्हाळ्यात गेली चार महिने शुकशुकाट आहे. हॉटेल क्वचित सुरू आहेत. तिथे पार्सल सेवा आहे तर ग्राहक नाहीत अशी स्थिती आहे. 

" कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन आहे. वर्षा पर्यटनाला यंदा कोणी आलेले नाही, हॉटेलपासून ते चहा गाडीपर्यंत सर्वच व्यवसाय थंड आहेत. हे नुकसान भरून काढणे अशक्‍य आहे. पर्यटन हंगाम लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा आहे. तसे न घडल्यास किरकोळ व्यवसायिक व कामगारांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.'' 
- चंद्रकांत केरेकर, हॉटेल चालक, शाहूवाडी. 

उलाढालीला असाही फटका 
शाहूवाडीत एका हॉटेलमध्ये कमीत कमी पाच कामगार आहेत. जवळपास पन्नास हॉटेल आहेत. याशिवाय जंगल सफारीच्या गाड्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कामगार बसून आहेत किंवा गावी गेलेत. रोज किमान चाळीस पन्नास ताटाचे जेवण होते. ते बंद आहे. मंसाहारी जेवणासाठी चिकन, अंडी बकरीचे मांसाची मागणी थांबली आहे. त्यामुळे मांस विक्रेत्यांनाही ग्राहक नाही. यासाऱ्या दिवसाकाठीची किमान दोन ते पाच लाखाची उलाढाल गेली चार महिने बंद आहे. पन्ह्याळ्यात जवळपास शंभरावर हॉटेल तेवढेच पिठले, भाकरी, नाष्टयाचे स्टॉल्स बंद आहेत. 

loading image
go to top