
Weather Alert Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली. त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल करणाऱ्या पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटाने घट झाली. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून, इतर जिल्हा मार्ग नऊ व ग्रामीण मार्ग १७ असे एकूण २६ मार्ग बंद आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली. पावसाची उघडीप असली तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.