esakal | राजापूरच्या गंगेचे आगमन; यंदाही गंगास्नानाची पर्वणी हुकणार ?

बोलून बातमी शोधा

राजापूरच्या गंगेचे आगमन; यंदाही गंगास्नानाची पर्वणी हुकणार ?
राजापूरच्या गंगेचे आगमन; यंदाही गंगास्नानाची पर्वणी हुकणार ?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे सलग दुसर्‍या वर्षी आगमन झाले आहे. काल (29) रात्री उन्हाळे तीर्थक्षेत्री 310 दिवसांनी आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी ती जोरदारपणे प्रवाहित आहे. गतवर्षी 15 एप्रिलला गंगामाईचे आगमन झाले होते. वर्षभरामध्ये एकाच महिन्यामध्ये 15 दिवसांच्या फरकाने झालेले आगमन औत्सुक्याचा विषय बनला आहे.

गंगामाईचे गतवर्षी 67 दिवस वास्तव्य होते. 21 जून 2021 रोजी तिचे निर्गमन झाले होते. उन्हाळे येथील काही ग्रामस्थांच्या गंगामाईचे आगमन आज निदर्शनास आले. नेमके किती वाजता आगमन झाले याबाबत निश्‍चित माहिती नाही. तरी काल रात्री उशिरा आगमन झाल्याचा अंदाज गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे यांनी व्यक्त केला. सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही प्रवाहित आहे.

हेही वाचा: देवगड, वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारणार : उदय सामंत

गंगामाईचे आगमन आणि निर्गमनाचे विज्ञानालाही कोडे सुटलेले नाही. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने भाविकांची गंगामाईत पवित्र स्नान करण्याची संधी हुकली होती. यावर्षीही संचारबंदी असल्याने भाविकांची गंगास्नानाची पर्वणी हुकण्याची शक्यता आहे.

गंगेचे झालेले आगमन आणि तिच्या वास्तव्याचा काळ

मार्च - 1985-68 दिवस, जून - 1885-17, डिसेंबर - 1886-45, ऑक्टोबर- 1989-18, डिसेंबर- 1890-45, ऑगस्ट- 1893-16, जुलै- 1895-18, जून- 1897-22, एप्रिल- 1899-45, मार्च- 1901-45, एप्रिल - 1902-52, एप्रिल- 1905-66, सप्टेंबर- 1908-51, मार्च- 1910-51, मे- 1913-36, जून- 1915-29, सप्टेंबर -1918-53, त्यानंतर 18 वर्षाचा खंड...

जुलै- 1936-12, जून, 1938-27, एप्रिल-1942-45, ऑ क्टोबर- 1945-33, मार्च- 1948-39, मार्च- 1950-53, जानेवारी- 1952-27, जुलै, 1955-48, 5 मे- 1957-41, 8 मार्च- 1960-61, 23 जानेवारी- 1963-48, 7 मार्च- 1965-50, 8 मार्च- 1967-71, 2 मार्च- 1970-72, 2 जाने- 1973-59, 28 डिसें-1974-64, 22 फेब्रु- 1977-83, 30 डिसें- 1979-68, 4 जून - 1981-18, 5 जून- 1983-21, 4 मे- 1985-45, 17 मार्च- 1987-69, 3 एप्रिल- 1990-59 30 मार्च- 1993- 75, 10 जून, 1995-61, 25 एप्रिल-1998-62, 26 जाने- 2001-98, 9 एप्रिल- 2003-29, 20 डिसें- 2004-63, 13 मे- 2007-70, 28 मे- 2009-70, 10 फेब्रु- 2011-116, 11 एप्रिल- 2012, 23 जून- 2013, 23 जुलै- 2014, 27 जुलै-2015, 31 ऑगस्ट- 2016, 7 मे- 2017, 6 डिसें- 2017, 7 जुलै- 2018, 25 एप्रिल- 2019-60, 15 एप्रिल- 2020 -67.