

Farmers Block Sugarcane-Laden Tractors at Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory During a Price Protest in Kolhapur
esakal
कोल्हापूर: ऊसदराची घोषणा न करताच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून आंदोलन केले. माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी ऊसदरावर तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी ग्वाही दिली.