पोलिसांवर AK-47 ने गोळीबार करत फरार झालेल्या गँगस्टरला कोल्हापुरात अटक

 rajasthan and  Maharashtra Police, Crime News,most wanted criminal, Kolhapur
rajasthan and Maharashtra Police, Crime News,most wanted criminal, Kolhapur

कोल्हापूर : दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात मोस्ट वांटेड शक्ती गुर्जर मोरक्या पप्पाला उर्फ विक्रम गुर्जर (वय ३३ रा. खैरोली, जिला महेंद्रगड, हरियाणा) याला राजस्थान पोलिसांच्या कमांडो सहित विशेष पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले. स्थानिक निवडणुकीच्या वादातून झालेल्या एका खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असताना पपला याला बेहरोड राजस्थान पोलिसांनी अटक केली होती. खंडणी मारामारी जीवे मारण्याच्या धमक्या व खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे पगुन्हेला याच्या विरुद्ध राजस्थान व हरियाणा येथे नोंद करण्यात आले आहेत . स्थानिक टोळीचा तो शक्ती गुर्जर यांच्या हत्येनंतर मोरक्या बनला होता.

कोल्हापूर मध्ये त्याने आपले नाव बदलून उदलसिंग असे आधार कार्ड बनविले होते. अटक केलेल्या पोलीस ठाण्यावर जमावाने 6 सप्टेंबर 2019 रोजी एके-47 रायफलने अंदाधुंद गोळीबार करीत टोळी सह पलायन केले होते. तेव्हापासून राजस्थान पोलिसांचे विशेष पथक त्याच्या मागावर होते.

आतापर्यंत त्याच्या पन्नास साथीदारांना अटक करण्यात आली होती परंतु अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी झाला होता . परंतु राजस्थान पोलिसांना तो कोल्हापुरात असल्याचा सुगावा लागल्यापासून आठ दिवसांत पासून त्याचा कोल्हापूरमध्ये शोध सुरू होता. दरम्यान 28 जानेवारीच्या पहाटे दोन वाजता सरनोबतवाडी येथील त्याची प्रेयसी जिया ऊस सहर हिच्या घरी लपला असता नियोजनबद्ध कारवाईने त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी शरण येण्यास सांगितल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर व्यायाम करीत असणाऱ्या पपलाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु शस्त्रसज्ज कमांडो जणी त्याला तात्काळ जेरबंद केले पकला ची माहिती देणाऱ्यास राजस्थान पोलिसांकडून प्रथम दोन लाख व सध्या पाच लाखाचे रोख बक्षीस लावण्यात आले होते .पपला बरोबरच त्याची प्रेयसी जिया हिलाही पोलिसांनी अटक केली असून दोघांनाही वाहनाने कोल्हापूर ते पुणे व पुणे ते अहमदाबाद व तेथून जयपूरला हवाई मार्गे नेण्यात आले असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक चकित

गेल्या अनेक दिवसांपासून सरनोबतवाडी येथे वास्तव्याला असणारा उदलसिंह हा उदलसिंह नसून मोस्ट वाँटेड ड पपला आहे हे समजताच स्थानिक नागरिक चकित झाले. कारवाई वेळी तेथील सर्व गल्ल्या सील केल्या होत्या स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार ९० हून अधिक पोलिस या कारवाई मध्ये सहभागी होते.

पोलिसांचे उत्तम नियोजन

एके-47 ने गोळीबार करीत पोलिस ठाण्यातून पलायन केलेल्या खतरनाक गँगस्टर म्होरक्याला जेरबंद करण्यासाठी राजस्थान पोलीस व स्थानिक पोलिसांनी नेटके नियोजन केले होते. दोन दिवसांपासून राहत असलेल्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती तसेच सीसीटीव्ही, फळविक्रेते , स्थानिक परप्रांतीय यांच्या साह्याने जास्तीतजास्त माहिती जमवण्यात आली होती व संभाव्य पलायन वाटेवरती कमांडो तैनात करण्यात आले होते. बेसावध असताना पहाटे दोन वाजता कारवाई करीत पपला ला अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com