
Mahadevi Elephant Protest : नांदणी गावातील ‘महादेवी’ हत्तीला अंबानी यांच्या ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. या निर्णयावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “एक बड्या उद्योगपतीचा बालहट्ट पुरवण्यासाठी समाजाच्या भावना पायदळी तुडवून हा निर्णय लादला गेला आहे. हे अंबानी उद्योगसमूहाला महागात पडेल." असे शेट्टी यांनी सकाळ ऑनलाईनशी बोलताना प्रतिक्रीया दिली.
दरम्यान, याबाबत आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.