esakal | नॅशनल हायवेवर पुलांचा भराव काढून कमानीचे बांधकाम करा; राजू शेट्टींची गडकरींकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

नॅशनल हायवेवर पुलांचा भराव काढून कमानीचे बांधकाम करा

पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागला. नागरी वस्तीतसह शिवारात जास्त दिवस पाणी राहिले.

नॅशनल हायवेवर पुलांचा भराव काढून कमानीचे बांधकाम करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे - बेंगलोर व रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचा भराव कमी करुन कमानी स्वपरुपात बांधकाम करावे अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे एका निवदेनाद्वारे केली.

निवेदनात म्हंटले आहे, सांगली जिल्ह्यातील पेठनाका ते बेळगाव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका, आंबा घाटापासून ते मिरजेपर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यांवरील पुलामुळे व भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागात महापुराने थैमान घातले. पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागला. नागरी वस्तीतसह शिवारात जास्त दिवस पाणी राहिले. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने या महामार्गावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधली पाहिजे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

२००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलली आहे. आंबोली पासून ते महाबळेश्वर पर्यंतच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर एकाच दिवसात ८५० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याने पाणी वेगाने नदीपात्रात आले. कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर बांधलेल्या पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे.

महापूरामध्ये नद्यांच्या पात्रापासून दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थीती निदर्शनास आणून दिली. या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील या चार नद्यांवरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस २-२ कमानींचे बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.

हेही वाचा: मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?

रत्नागिरी-नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबा घाट ते मिरज शहर बायपास रोड या मार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पुल बांधकाम व भराव टाकण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करणेस निधी उपलब्ध करून तातडीने या कामांना सुरवात करण्याची मागणी केली. येत्या १५ दिवसात कोल्हापूर, सांगली व बेळगाव या तीनही जिल्ह्यातील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांच पथक पाठवून देण्यासदर्भात मंत्रालयातील संबंधित अधिका-यांना सुचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.

loading image
go to top