Raju Shetti Raises FRP Payment Issue : ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर तातडीची कारवाई करण्याची राजू शेट्टींची मागणी, काटामारी व उताऱ्यात फेरफार थांबवण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यावर शासनाचे ऑनलाईन वजनकाटे बसवण्यावर भर
जयसिंगपूर : राज्याचे सहकारमंत्र्यांनीच ऊस उत्पादकांची एफआरपी थकीत ठेवली आहे. इतर कारखानदारांनीही जवळपास दीड महिने झाले तरीही ऊस उत्पादकांनी एकरकमी एफआरपीप्रमाणे होणारी बिले दिलेली नाहीत.