
Raju Shetti Mahavikas Aghadi : इचलकरंजी महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी संभाव्य प्रभाग रचना लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. यासाठी सहा जणांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे. इचलकरंजी काँग्रेस कमिटीमध्ये आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. एकाच चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यावरही एकमत झाले. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानीही सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.