
कोल्हापुरात एक अनोखे आणि भावनिक दृश्य पाहायला मिळाले. गुजरातमधील वनतारा सेंटरमधून ३६ वर्षीय हत्तीणी 'महादेवी' परत आणण्यासाठी हजारो लोक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले. या मागणीसाठी हजारो लोकांनी मूक मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नंदिनी येथून हा मोर्चा निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. जिथे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यानंतर राजू शेट्टींनी संवाद साधला आहे. यात त्यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.