
कोल्हापूरची माधुरी हत्तीणी गुजरातमधील जामनगरला हलवली गेली. ती शिरोळ तालुक्यातील नंदनी येथील जैन मठाची महादेवी हत्तीण होती. यामुळे कोल्हापूरच्या नंदनी मठातील लोक भावुक झाले आणि मोठ्या संख्येने लोक निरोप देण्यासाठी जमले होते. ते म्हणतात की, ती फक्त हत्तीण नव्हती तर त्यांच्या धार्मिक संस्कृतीचा भाग बनली होती. अनेक जैन धार्मिक विधींमध्ये भाग घेतला. श्रद्धेचे प्रतीक बनली. यानंतर आता या प्रकरणावर राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे.