

Ichalkaranji News
sakal
इचलकरंजी: शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या राजवाडा चौक ते जुना सांगली नाका (पोटफाडी) या रस्त्याच्या रूंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या संदर्भातील भू - संपादनाची अधिसूचना नुकतीच राज्य शासनाने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.