

Officer Inspiring Journey
esakal
Class One Officer Inspirational Journey : संदीप खांडेकर : रामानंदनगर पुलावरील गजबजलेल्या चौकात मोठा फलक. क्लास वन अधिकारी राकेश महादेवी सिद्राम सुरगोंड असा त्यावर उल्लेख. उपविभागीय जल संधारण अधिकारीपदी निवड झालेल्या राकेश यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा फलक. वडील गवंडी, काबाडकष्ट उपसणारी आई अन् भाड्याचे घर असा त्यांचा काटेरी प्रवास. गरिबीवर मात करत जीवनात यशस्वी कसे व्हावे, याचा दाखला त्यांच्या यशाने दिला आहे.