Kolhapur News: कुरुंदवाडच्या राजकारणात खळबळ! ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी भाजपला ‘दे धक्का’; राजर्षी शाहू आघाडीत प्रवेश
Political Turmoil: ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामचंद्र डांगे यांनी घेतलेला निर्णय भाजपसाठी केवळ एक राजकीय धक्का नाही, तर स्थानिक स्तरावर पक्षाच्या संघटनात्मक बळावर आणि मतदारांमधील विश्वासावर थेट परिणाम करणारा ठरला आहे.
कुरुंदवाड: भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.