
Ramdas Athawale Vs Raj Thackeray : ‘मराठी आमची मातृभाषा तर हिंदी राष्ट्रभाषा आहे. परप्रांतीयांनी मराठी शिकले पाहिजे; पण मराठी येत नाही म्हणून त्यांना मारणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांची दादागिरी सहन करणार नाही. गरज पडली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल,’ असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.