
कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल, कारण समाजापेक्षा मंत्रिपद मोठे नाही, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.