esakal | Video : वाचकांनो घाबरु नका ; सकाळ आहे तुमच्यासोबत...
sakal

बोलून बातमी शोधा

Readers do not panic daily sakal is with you kolhapur marathi news

वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होत नाही हे यापूर्वीच विविध माध्यमांनी स्पष्ट केले आहे. तरीही  सकाळ ने  एक पुढचे पाऊल उचलले आहे..

Video : वाचकांनो घाबरु नका ; सकाळ आहे तुमच्यासोबत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सामाजिक बांधिलकी जपत उत्पादक क्षेत्रात काम करणाऱ्या सकाळ माध्यम समूहाने वृत्तपत्रावर सॅनिटायझरचा वापर करून वाचकांना अधिक सुरक्षित अंक देण्याचा प्रयत्न केला आहे.

वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोनाचा  प्रसार होत नाही हे यापूर्वीच जाहीर केले असले तरी अधिक सुरक्षितता म्हणून ही उपाय योजना सकाळ माध्यम समूह कडून करण्यात आली आहे.

 हेही वाचा- ‘होम क्वॉरंटाईन’ असताना ते गेले बाहेर अन्....

वाचकांनो घाबरु नका
सध्या कोरोना  संशोधनाबाबत जोरदार उपायोजना बाबत अनेक मोहिमा सुरू आहेत. दररोज लाखो वृत्तपत्र विक्री त्यांच्या माध्यमातून वाचकांच्या पर्यंत जात असतात अशा वेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून संसर्ग होऊ नये यासाठी सकाळ माध्यम समूहाने पेपर छपाई होत असतानाच त्यावर सॅनिटायझरचा  वापर केला आहे. यामुळे वृत्तपत्र अधिक सुरक्षितपणे वाचकांच्या हातात पडण्यास मदत झाली आहे.  दैनिक सकाळ ने टाकलेले हे पाऊल लाखो वाचकांना त्यांच्यामध्ये अधिक विश्वास निर्माण करणारे ठरले आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होत नाही हे यापूर्वीच विविध माध्यमांनी स्पष्ट केले आहे. तरीही  सकाळ ने  एक पुढचे पाऊल उचलले आहे..