Crime News : आतेभावानेच रचला लुटीचा कट; राजस्थानातील टोळीची दोन महिन्यांची तयारी उघड

robbery conspiracy : नातेवाईकाच्या मदतीने लुटीचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. राजस्थानातील टोळीने दोन महिन्यांपासून तयारी करून गुन्ह्याचे नियोजन केले होते.
theft case

theft case

sakal

Updated on

कोल्हापूर : मामेभाऊ कोल्हापुरात येऊन राहिला. सांगरूळसारख्या भागात सराफ दुकान चालवून प्रगती केली. भावाची प्रगती राजस्थानात राहणाऱ्या आतेभावाच्या डोळ्यात खुपली. साथीदारांना घेऊन आलेल्या या भावाने दोन महिने पाळत ठेऊन सराफाला लुटले. मोठ्या अपेक्षेने आलेल्या टोळीच्या हाती मात्र फारसे काही लागले नाही. वितळवलेले सोने स्थानिक साथीदाराकडून घेण्यास आलेली महिला संशयित पोलिसांच्या हाती लागली अन् लुटीचा उलगडा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com