

Fake Liquor Racket
sakal
हुपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे बनावट देशी मद्यनिर्मिती व साठ्यावर छापा टाकून मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे स्पिरिट, विविध कंपन्यांचे लेबल असलेल्या देशी मद्याच्या बाटल्या, टोपण, पुठ्ठ्यांची खोकी तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण २५ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (ता. २४) रात्री उशिरा करण्यात आली.
या प्रकरणी संशयित वसंत धनाजी पाटील (वय ५२), अरुण भाऊ बुरुंगले (वय ३२) व आमिर सज्जन शिकलगार (वय ४५, तिघेही रा. हुपरी) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.