

Former Zilla Parishad President Yashoda Koli during her tenure as district head.
sakal
अध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कै. नाना गाठ यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले. पण, या प्रवर्गाचे सदस्यच सभागृहात नसल्याने शासनाने आरक्षण बदलून ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडले आणि त्यातून सौ. यशोदा बाळासाहेब कोळी यांना संधी मिळाली.