esakal | गोकुळ रणांगण! पुन्हा सत्ताधारी की सत्तांतर? फैसला उद्या
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ रणांगण! पुन्हा सत्ताधारी की सत्तांतर? फैसला उद्या

गोकुळ रणांगण! पुन्हा सत्ताधारी की सत्तांतर? फैसला उद्या

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील तीन मंत्री, दोन खासदार आणि डझनभर आजी-माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) पुन्हा सत्तारूढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसला उद्या ( 4) होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल, दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल. अंतिम निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत अपेक्षित आहे.

गोकुळच्या निवडणूकीत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीकडून विजयाचा दावा केल्याने या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला लागून राहीली आहे. 'गोकुळ' च्या निवडणुकीसाठी रविवारी (2) इर्षेने 99.78 टक्के मतदान झाले आहे. तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू; सिरसेतील दुर्घटना

हेही वाचा: तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू; सिरसेतील दुर्घटना

जिल्ह्यातील 12 तालुक्‍यातील 70 केंद्रावर हे मतदान झाले. यापैकी सात तालुक्‍यात शंभर टक्के मतदान झाले. एकूण 3647 मतदारांपैकी 3639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे, सत्तारूढ आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा सत्तारूढ गटाला विश्वास आहे. याउलट यावेळी सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधी आघाडी गोकुळमध्ये सत्तांतर करेल असा विरोधी पॅनेलने दावा केला आहे.

loading image