
Digital Tools for Talathis : ‘महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय प्रश्नांवर महिन्यातून किमान एकदा एकत्र येऊन बैठक घ्यावी,’ अशा सूचना महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिल्या. तसेच तलाठ्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे, यासाठी त्यांना नवीन अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटर एक महिन्याच्या आत वितरित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.