Kolhapur ZP schools to go digital — 1,957 rural schools set for hi-tech classroom transformation under 5-year plan.Sakal
कोल्हापूर
माेठी बातमी! 'काेल्हापूरातील जिल्हा परिषद शाळा होणार हायटेक'; पाच वर्षांत १९५७ शाळांचा होणार कायापालट
जिल्ह्यातील अतिदुर्गम शाळांत तसेच धनगर वाड्यासारख्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील शाळांत प्रामुख्याने सर्व सुविधा देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीवेळी आवश्यक निवारा शेड, मतदान केंद्राच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सुविधाही या शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे.
सुनील पाटील
कोल्हापूर : दर्जेदार आणि चांगल्या इमारतींत मुलांना शिक्षण घेता यावे, मुलांच्या शिक्षणाला अधिक गती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक केल्या जाणार आहेत. पाच वर्षांत होणाऱ्या हायटेक शाळांत घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, स्वच्छ व मुबलक पाणी आणि सुसज्ज प्रयोगशाळा देण्याचे महत्त्वपूर्ण नियोजन केले आहे.