रिक्षाचालकांची मदतीच्या आमिषाने दिशाभूल

रिक्षाचालकांची मदतीच्या आमिषाने दिशाभूल
Updated on

कोल्हापूर : चुकीची माहिती पसरवून रिक्षा चालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, भाजप रिक्षा संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे दिले. जिल्हा पोलिस अधीक्षकांना डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन दिले. 
निवेदनात म्हटले आहे, की लॉकडाउनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे हाल होत आहेत. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, म्हणून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा संघटना लोकप्रतिनिधी तसेच ई-मेल, पत्रव्यवहाराद्वारे राज्यशासनाकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करत आहेत. शासनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही; परंतु कोल्हापुरातील काही संघटनांचे तथाकथित नेते जणूकाही शासनाने त्यांना "सरकारी प्रतिनिधी' नेमलेच्या अविर्भावात रिक्षा चालकांकडून त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्‍स प्रतींची मागणी करत आहेत. ठराविक वेळेत शहरातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी दोन आणि सायंकाळी पाच ते सात वेळेत आणू जमा करण्याचे आवाहन केले आहे. मुळातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून सर्वांनी घरीच राहावे, अशी विनंती केली जात आहे; परंतु प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे नेते रिक्षाचालकांना त्यांच्या गरिबीचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या आणि कुटुंबियांच्या जीविताशी, आरोग्याशी खेळ करीत आहेत. जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की, चुकीची माहिती पसरवून रिक्षा चालकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून त्यांचा जीव धोक्‍यात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. 
रिक्षा चालकांना आमची विनंती आहे की, राज्यशासन ज्यावेळी मदत जाहीर करेल त्यावेळी प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला कळेलच. तसेच त्याची सर्व प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण घरातच राहून आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. निवेदनावर राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur SIR Voter List
Kolhapur-Mumbai Private Bus Ticket
Sonam Maskar Asian Games silver medal
Kini Toll Plaza Traffic update
Marathi News Esakal
www.esakal.com