

Kolhapur Irrigation Department farmers news
esakal
Water extraction ban in Kolhapur : खरीप हंगामाच्या तोंडावर आणि भात शेतीला पाण्याची अत्यंत गरज असताना कोल्हापूर पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर बंदी घातली आहे. या निर्णयाचा मोठा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार असून खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. एल निनोमुळे पावसात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.