

Dhuloba Ramling Devasthan
esakal
Hatkanangale Temple Road : (अतुल मंडपे) : आळते (ता. हातकणंगले) येथील रामलिंग धुळोबा देवस्थानाकडे जाणारा पवार टेकावरील रस्ता अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने उकरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रस्ता कोणी आणि कोणत्या कारणासाठी उकरला, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.