
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवित दोन घरांतून १५ लाख ३९ हजारांचे साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये लुटून नेले. यामध्ये बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घरातील अठरा तोळ्यांचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये; तर प्रदीप मारुती चव्हाण यांच्या आईच्या गळ्यातील चेन हिसकावून घेऊन चोरट्यांनी पलायन केले.