Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

Rohini Devaba Inspiring Journey from Poverty to Asian Gold : पट्टणकोडोलीच्या रोहिणीने गरिबी, संघर्ष आणि आर्थिक अडचणींवर मात करत आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आता तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Rohini Devaba World Wrestling Championship

Rohini Devaba World Wrestling Championship

esakal

Updated on

पट्टणकोडोली (कोल्हापूर) : वडिलांनी बकरी विकली, कर्ज काढले... मुलीने वजन कमी करण्यासाठी स्वतःचे केस कापले आणि या संघर्षातून आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत (Asian wrestling gold medalist from Maharashtra) देशाचा तिरंगा फडकावला. मात्र, आशियावर गाजलेली पट्टणकोडोलीची कन्या रोहिणी खानदेव देवबा आता नव्या संघर्षासमोर उभी आहे. युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली असली, तरी गरिबी आणि वाढत्या खर्चाच्या आव्हानांशी झुंज देत ही सुवर्णकन्या जागतिक मंचावर झेप घेण्यासाठी तयारी करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com