esakal | अवघ्या दोन वर्षाचा रोनित मार्लेची झाली 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या दोन वर्षाच्या रोनितची झाली 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

अवघ्या दोन वर्षाच्या रोनितची झाली 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: कोरोची (ता. हातकणंगले) येथील रोनित मार्ले याची अवघ्या दोन वर्षाचा असताना त्याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. शाळेत जाण्यापूर्वीच रोनीत जगाच्या नकाशावर कोठेही बोट ठेवताच पटकन त्या देशाचे नाव सांगतो. याशिवाय विविध रंग, जीव, फळे, कीटक, जंगली प्राणी, भौमितिक आकार यांची नावे चित्रांवरून क्षणात ओळखतो. तसेच इंग्रजी आकडे, वर्णमाला शब्दासहित म्हणून दाखवतो. अशा बौद्धिक कौशल्याची दखल घेत रोनितची नोंदणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

हेही वाचा: चंदगड: विद्यार्थ्यांच्या कलाकारीतून साकारल्या बाप्पांच्या मूर्ती

अवघ्या वर्षातील मुलाची बुद्धिमत्ता पाहून नागरिकही अवाक होत आहेत. रोनितची आई सांगते, ‘जन्मापासूनच रोनितची बौद्धिक व शारीरिक वाढ इतर मुलांपेक्षा जलद गतीने होत असलेले जाणवले. बसणे, चालणे, बोलणे या क्रिया तो लवकर शिकला. आम्ही घरामध्ये जसे वागतो, बोलतो, क्रिया करतो ते सर्व बघून त्याचे निरीक्षण करून त्याप्रमाणे तो अनुकरण करत होता. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक क्रिया करताना आम्ही सतत इंग्रजी आकडे, अल्फाबेट म्हणून दाखवत होते.

तसेच त्याचा बराचसा काळ लॉकडाऊनमध्ये गेल्याने त्याला जास्तीत जास्त गोष्टी प्रत्यक्ष दाखवून देत होतो. हे ऐकून त्याच्या लक्षात राहत गेले. हे सर्व रेकॉर्ड करायचे या हेतूने करत नव्हतो. तो त्यामध्ये रमत असल्याने आम्ही त्याला सर्व सांगत गेलो. लहान मुलांची छोटी पुस्तके, बाराखडी, दाखवत होतो. बोलायला लागल्यापासून असे लक्षात आले की गोष्ट त्याच्या कानावर पडली की त्याला पाठ होऊ लागल्या. अशाप्रकारे तो बरंच काही शिकत गेला.

रोनित अवघ्या एक वर्षाचा असताना त्याच्या कुशाग्र बुद्धिमतेबाबत समजले. अशा लहान मुलांच्या अलौकिक बुध्दीमतेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होत असल्याचे ऐकले होते. त्यानुसार रोनितचे भरपूर व्हिडिओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठवले. त्यातून २० व्हिडीओची निवड करून त्याच्या बौद्धिकतेची दखल घेतली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे.’

रोनितचे वडिल म्हणून मला त्याचे खूप कौतुक वाटते. त्याने लहान वयातच अभिमानास्पद कौशल्य आत्मसात केले आहे. -रोहन मार्ले, वडील

loading image
go to top