esakal | Video -बॅगनिर्मिती व्यवसायातून जीवनाला उभारी 
sakal

बोलून बातमी शोधा

 Sacsee  story foe bag bigness women

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द लागते हे रंजना यांनी सिद्ध केले.

Video -बॅगनिर्मिती व्यवसायातून जीवनाला उभारी 

sakal_logo
By
आकाश खांडके

कोल्हापूर - मुडशिंगीत राहणाऱ्या रंजना बाजीराव लव्हटे यांच्या भाड्याच्या घरातून दिसणाऱ्या दोन मजली बांधकामाकडे बघत त्या म्हणाल्या, ""बॅगनिर्मितीच्या व्यवसायाने मला उभारी दिली. या जोरावर हे बांधकाम सुरू आहे.'' 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द लागते हे रंजना यांनी सिद्ध केले. दहावीत आलेले अपयश पचवणे कठीण असते. काही दिवस त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले, पण त्याला बळी न पडता त्यांनी नवीन सुरुवात केली. स्वयंसिद्धाच्या कार्यशाळेत नाव नोंदवले आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू केला.

बॅगनिर्मितीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हातात चार पैसे यायला लागले यातून त्यांचा आत्मविश्वास उंचावला. हे सुरू असताना कुटुंबीयांनी लग्नाचा जोर धरला. 
दहा वर्षे त्या संसाराचा गाडा हाकण्यात व्यस्त होत्या. मुले मोठी होताच त्या जुन्या व्यवसायाकडे वळल्या. या वेळी त्यांनी कामाचा आवाका वाढवला. गरजू महिलांना विनामूल्य शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवले. त्यांच्या रेगजीन बॅगला मागणी होतीच त्याचबरोबर त्यांनी कापडी बॅग बनवायला सुरुवात केली. त्या पाच रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या बॅग बनवतात. सहकाऱ्यांच्या साहाय्याने त्या महिन्याला शंभर ते दीडशे बॅगची निर्मिती करतात. त्यांनी बनवलेल्या बॅगला कोल्हापूर, पुणे व बेळगावमधून मागणी आहे. रंजना यांनी गावातील महिलांसाठी बचत गट सुरू केला आहे. 

<

>

"बॅग व्यवसायाने मला गमावलेला आत्मविश्‍वास पुन्हा मिळवून दिला. या व्यवसायात पडताना मनात अनेक प्रश्‍न उभे होते. अपयशाची भीती होती. पण कुटुंबीयांनी साथ दिली.

लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प असताना मी व माझ्या सहकऱ्यांकडे काम होते. त्यामुळे कुणालाही आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले नाही. 

हे पण वाचा - टॉप्स मागितल्याने मेहुणीवर चाकू हल्ला

भविष्यात व्यवसाय विस्तार करण्याचा मानस आहे. त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. कुटुंबीयांची साथ असल्यामुळे हा पल्ला पार करता येईल, याचा आत्मविश्वास आहे. 
- रंजना लव्हटे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top