esakal | सदाभाऊ खोत-राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष वाढणार? तक्रार थेट गृहमंत्र्यांकडे
sakal

बोलून बातमी शोधा

सदाभाऊ खोत-राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष वाढणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला सदाभाऊंच्या समर्थकांनी घरात घूसून मारल्याचा आरोप आहे.

सदाभाऊ खोत-राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष वाढणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यभर विस्तार करून ताकद निर्माण करणाऱ्या दोन बलाढ्य शेतकरी नेत्यांतील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्याला सदाभाऊंच्या समर्थकांनी घरात घूसून मारल्याचा आरोप आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज स्वाभिमानीने या प्रकरणाची तक्रार थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip valase-patil) यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: चिपी विमानतळावरून आमदार केसरकरांचा राणेंना नाव न घेता टोला

माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचा मुलगा सागर खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तांबवे (ता. वाळवा) येथील कार्यकर्ते रवीकिरण माने यांना मारहाण केल्याचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांकडे पोहचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल (Ranjeet Bagal) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या प्रकरण्याची तक्रार केली.  

हेही वाचा: महापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार

बागल म्हणाले, 'सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून आमच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण हा लोकशाहीवर हल्ला आहे. घरात घुसून मारहाण करणे हा प्रकार गंभीर आहे. या तपासात कोणताही राजकीय दबाव असता कामा नये. सागर खोत यांची मुजोरी थांबली पाहिजे, अशी मागणी मी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी आमची बाजू नीट ऐकून घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन दोषी जो कुणी असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. कोणत्याही पदाचा गैरवापर करुन कुणी तणाव निर्माण करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कानावर घालून मी गृहमंत्र्यांना भेटलो आहे. शेट्टी (Raju Shetti) यांना कार्यकर्त्यांची सुरक्षा अधिक महत्वाची, राजकारण नंतर, असे मला त्यांनी सांगितले.'

loading image
go to top