सडोली: खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात येणारा हसूर दुमाला (ता. करवीर) पंचायत समिती गण राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. त्यामुळे उमेदवारी देताना अधिक लोकसंख्येच्या गावांना महत्त्व येणार आहे. .यामध्ये हसूर दुमाला, म्हालसवडे, कांचनवाडी, घानवडे या गावांतीलच उमेदवारी दिली जाऊ शकते. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना शिंदे गट, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस या पक्षांचे प्राबल्य आहे.- सुरेश पाटील. सोनाळी.Kolhapur News: ओबीसी महिला प्रवर्गामुळे रंगणार बहुरंगी सामना; कळेत राजकीय घराण्यांची धावपळ वाढली!.गत पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे आमदार स्व. पी. एन. पाटील गटाचे काँग्रेसचे निष्ठावंत उमेदवार विजय बाबूराव भोसले (कांचनवाडी यांनी २९०० मतांची आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार तुकाराम आनंदा खराडे (हसूर दुमाला) यांच्यावर विजय मिळविला होता. .भाजपचे उमेदवार मेजर भिकाजी जाधव (आरळे) यांनी लक्षवेधी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यंदा हा मतदारसंघ खुला झाल्याने व करवीर पंचायत समितीचे सभापतिपद खुले असल्याने येथे उमेदवारीसाठी झुंबड उडणार आहे. .Kolhapur Election: आरक्षणानंतर जागांसाठी सुरु होणार रस्सीखेच; महायुतीतल्या समीकरणावर ठरणार कोल्हापूरचं भविष्य!.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहुल पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे भक्कम दिसत आहे. येथे काँग्रेसचे पारंपरिक हात हे चिन्ह मतदारांच्या मनावर बिंबले आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार अपवाद वगळता कायमपणे निवडून येत होता, पण काँग्रेसचा गटच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाल्याने येथे घड्याळ चिन्ह मतदारांत कसे रुजते, ते पाहावे लागेल. .महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर असले तरी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राहुल पाटील, महाविकास आघाडीचे नेते शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या गटाची युती आहे. शिवसेना शिंदे गटाचे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व भाजपचे नेते हंबीरराव पाटील, .दतात्रय मेडसिंगे यांची युती आहे. पण, पंचायत समितीसाठी हे चारही गटांतून इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. येथे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांची ताकद अल्प असल्याने ते कोणाला पाठिंबा देतात की स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवितात, यावर निवडणुकीतील विजयाचे गणित अवलंबून आहे..येथे काँग्रेसला उमेदवार शोधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मतदारसंघात अजित पवार गटाची ताकद वाढली असली तरी उमेदवारीसाठी या पक्षात इच्छुकांमध्ये रस्सीखेच वाढली आहे. त्यामुळे येथे संभाव्य होणारी बंडखोरी व त्याचा परिणाम जिल्हा परिषद उमेदवारावर होणार का, याबद्दल उत्सुकता आहे..दृष्टिक्षेपात २०१७ निवडणूकविजय बाबूराव भोसले (कांचनवाडी ), काँग्रेस ७६०० विजयी, तुकाराम आनंदा खराडे (शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडी), (हसूर दुमाला) ४७००, मेजर भिकाजी जाधव (आरळे) भाजप, २२६५, .इच्छुक उमेदवार असे भाजप ः अक्षय वरपे (म्हालसवडे). राष्ट्रवादी अजित पवार गट ः सचिन पाटील (पाटेकरवाडी), भरत पाटील (आरळे), अनिल कोपार्डे (म्हालसवडे) .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.