Sahyadri Tiger : ताडोबासारखे सह्याद्री व्याघ्र दर्शन कधी? जंगल सफारीची वाढती मागणी
Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चार जिल्ह्यांतील १४ तालुक्यांतील जंगले जोडणारा महत्त्वाचा वन्यजीव पट्टा, ताडोबाला जाण्यासाठी होणारा मोठा खर्च टाळून सह्याद्रीतच व्याघ्र दर्शनाची संधी शक्य; नियंत्रित जंगल सफारीमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जागृती आणि स्थानिक रोजगारवाढ
कोल्हापूर : जंगलात फिरताना प्रत्यक्ष वाघ पाहण्याचा अनुभव रोमांचक असतो. वाघाच्या हालचाली समजून घेताना जिज्ञासा वाढते आणि त्यासोबत जंगलसंपदा संरक्षित ठेवण्याचे महत्त्वही अधिक प्रकर्षाने जाणवते.