Sainik Takli garment industry jobs
esakal
जयसिंगपूर : सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीमुळे केवळ उद्योगांची उभारणी होणार नसून, स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि विविध पूरक व्यवसायांच्या मोठ्या संधी निर्माण होणार (Sainik Takli MIDC) आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये विविध उद्योग सुरू झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा आणि वस्तूंची मागणी वाढणार असल्याने टाकळी तसेच परिसरातील गावांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.