गारगोटी - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामांची वार्षिक भंडारा यात्रा रद्द करण्यात आली. ‘कोरोना’ व्हायरसचे सर्वत्र सावट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी बैठकीत हा निर्णय घेतला.
देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सरपंच शोभाताई पाटील प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. व्यवस्थापक अशोक पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाचे वाचन केले. त्यांनी वेगाने पसरत असलेला कोरोना हा संसर्गजन्य रोग संत बाळूमामा भंडारा यात्रेनिमित्त एकत्र येणाऱ्या भाविकांना होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेऊया, असे आवाहन केले.
कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम म्हणाले, ‘‘संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम व हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व देवस्थान समितीला सहकार्य करावे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.