"भाषिक पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग सुरू असून येत्या पाच वर्षांत भाषिक पत्रकारिता कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापली जाणार आहे."
कोल्हापूर : ‘माध्यमांत तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. या तंत्रज्ञानापासून दूर राहता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा वेग आणखी वाढला असल्याने त्याला वगळून पत्रकारिता करता येणार नाही. ही कृत्रिम बुद्धिमत्ता संकट नसून माध्यमांसाठी ते अपरिहार्य तंत्रज्ञान आहे’, असे प्रतिपादन दैनिक ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis) यांनी केले.