esakal | ‘सकाळ’-‘व्हाईट आर्मी’मुळे मिळाले नवे आयुष्य
sakal

बोलून बातमी शोधा

KOLHAPUR

‘सकाळ’-‘व्हाईट आर्मी’मुळे मिळाले नवे आयुष्य

sakal_logo
By
सकाल वृत्तसेवा

कोल्हापूर: ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या सहकार्याने सुरू झालेले येथील जीवनमुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी) संचालित कोविड केअर सेंटर कोल्हापूरकरांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरले. या सेंटरमुळेच आम्हाला नवे आयुष्य आणि ते जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला, अशा भावना आज सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी व्यक्त केल्या. दिगंबर जैन बोर्डिंग येथील उपचार सेवेच्या सांगतेनिमित्त कृतज्ञता कार्यक्रमात सेंटरसाठी सहकार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा कोविड योद्धा म्हणून गौरव झाला. त्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रुग्णांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्‍हणाले, ‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना मोफत कोविड सेंटरची संकल्पना व्हाईट आर्मीने मांडली आणि सकाळ रिलीफ फंडाने त्याला आर्थिक बळ दिले. व्हाईट आर्मी आणि सर्व सहभागी संस्थांच्या आपुलकीच्या सेवेमुळेच अकराशेवर रुग्ण येथून ठणठणीत बरे होऊन घरी गेले. कुठल्याही आपत्तीच्या काळात ‘सकाळ’ येथून पुढेही अशा उपक्रमांच्या नक्कीच पाठीशी राहील.’’

हेही वाचा: दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव; तासात झालं होत्याचं नव्हतं

दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिगंबर जैन बोर्डिंगने चांगल्या कामासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून, येत्या काळातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी या सेंटरच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांबरोबर समाजासाठी काम करण्याचा चांगला अनुभव मिळाल्याचे सांगितले. केमिस्ट असोसिएशनचे राज्य संघटन सचिव मदन पाटील, कोरोनामुक्त रुग्णांतर्फे प्रा. स्वाती ढगे, संजय सूर्यवंशी, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनीही मनोगते व्यक्त केली.

दरम्यान, कोरोनाची सौम्य व प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांसाठी आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊनही लक्षणे नसणाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर कार्यरत राहिले. औषधोपचारांबरोबरच सकस व पौष्टिक आहार, योग-प्राणायामावर येथे भर दिल्याचे ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी सांगितले.

यांचाही झाला गौरव

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, दिगंबर जैन बोर्डिंग, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन, ‘निमा’ व ‘निहा’ संघटना, कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन, भगवान महावीर सेवाधाम ट्रस्ट आदी संस्था व संघटनांनी या सेवेत योगदान दिले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे रुग्णवाहिकेसाठी विशेष सहकार्य मिळाले.

हेही वाचा: कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण

व्हाईट आर्मीचा गौरव

कोरोना काळातील व्हाईट आर्मीच्या या सेवेचा सर्वच संस्था, संघटना प्रतिनिधींनी गौरव केला. श्री. रोकडे यांनी तर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे सर्वात अगोदर मनोबल वाढवून त्याला सकारात्मक ऊर्जा दिली. त्यामुळेच सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार.‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर ,अशोक रोकडे,व्यवस्थापक (वितरण) ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, डॉ. आशा जाधव, महेश डाकरे, व्हाईट आर्मीचे विनायक भाट, प्रशांत शेंडे सुरेश रोटे, संजय शेटे, मदन पाटील, ई. उपस्थित होते.

loading image
go to top